Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

इंद्रायणीनगरच्या नाना-नानी उद्यानात बकालपणा

इंद्रायणीनगरच्या नाना-नानी उद्यानात बकालपणा

समस्या तातडीने सोडवण्याची मागणी

marathinews24.com

पिंपरी –  इंद्रायणीनगर येथील नाना-नानी पार्कची दुरवस्था झाली आहे. लहान मुलांची खेळणी तुटली आहेत. ओपन जीमच्या साहित्यही नादुरुस्त अवस्थेत आहे. त्याचप्रमाणे येथे साचणाऱ्या पाण्यामुळे दलदल तयार झाली असून परिसरात डासांची संख्या वाढली आहे. या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी होत आहे.

वाकड परिसरात तंबाखूविरोधी जनजागृती – सविस्तर बातमी 

भोसरीतील पेठ क्रमांक दोनमधील नाना-नानी पार्क आहे. पार्कचे प्रवेशद्वारे तुटल्याने तेथे भटक्या श्वानांचा मुक्त वावर असतो. प्रवेशद्वाराजवळील पायऱ्याही तुटलेल्या आहेत. तेथील त्रिकोणी टोकदार बांधकामांमुळे ट्रॅकवरून ज्येष्ठ नागरिकांना खूपच काळजीपूर्वक चालावे लागते. खेळण्यातील झोका, घसरगुंडी, मल्टिपल खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. काही लोखंडी खांब तुटलेल्या अवस्थेत असल्याने मुलांना दुखापत होण्याचा धोका आहे. खेळण्या ठेवलेल्या भागात वाळूत माती आणि दगड मिसळून ते कडक झाल्यानेही लहानग्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पार्कमध्ये ओपन जीमचे साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र, महापालिकेने याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने काही साहित्य नादुरुस्त अवस्थेत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पार्कमध्ये गवताचे आच्छादन टाकण्यात आले. मात्र, पावसामुळे काही भागातील गवत वाहून गेले. तर काही भागात दलदल झाली आहे. तेथे पाणी साचत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि डासांची संख्याही वाढली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्कमधील समस्या दूर करण्याची मागणी माजी नगरसेवक संजय वाबळे, ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय दिवटे, प्रकाश झा, चंद्रकांत वाघ, बशीर तरासगार, मधुकर गुंजकर, संजय करगळ आदींनी महापालिकेकडे केली आहे. पार्कमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे. मात्र, यासाठी पाण्याच्या दिवशी पाण्याची टाकी भरून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. नळांच्या तोटीमधून पाणी गळत असल्याने तेथे शैवाल वाढून दुर्गंधी पसरली आहे.

जोडप्यांचा वावर

येथील प्रवेशद्वार तुटले आहे. तसेच सुरक्षा रक्षक नसल्याने पार्कमध्ये रात्रीच्या वेळी जोडप्यांचा वावर वाढला आहे. काही वेळा या परिसरात टवाळखोर तरुण येतात. त्यामुळे परिसरतील नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे, अशी कैफियत उद्यान परिसरातील राहणाऱ्या नागरिकांची आहे.

यासंदर्भात महापालिकेचे उद्यान अधीक्षक राजेश वसावे म्हणाले, इंद्रायणीनगरातील नाना-नानी पार्कमधील विविध कामे स्थापत्य विभागाकडून करून घेण्यात येणार आहेत. खेळणी आणि जीमच्या साहित्याचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. पार्कमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी शौच खड्डा बांधण्यात येणार आहे. वॉकिंग ट्रॅकमधील त्रिकोणाकृती टोकदार बांधकाम काढून ते नव्याने बांधण्यात येईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×