Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वाकड परिसरात तंबाखूविरोधी जनजागृती

वाकड परिसरात तंबाखूविरोधी जनजागृती

लाइफ पॉइंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि संस्कार प्रतिष्ठान तसेच शहरातील विविध संस्थांच्या सहकार्याने उपक्रम राबिविला 

marathinews24.com

पिंपरी – वाकड परिसरात तंबाखू विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आले. यावेळी सायकल फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली. यासह वॉकेथॉनचे प्रभावीपणे आयोजन करण्यात आले. लाइफ पॉइंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि संस्कार प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड यांच्या विद्यमाने तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

सेवानिवृत्तांचे आरोग्य शिबिर उत्साहात – सविस्तर बातमी 

या फेरीत सहभागी झालेल्यांनी सायकलीला आणि हातात विविध स्लोगन्स असलेले फलक घेऊन तंबाखूविरोधी संदेश दिला. ‘‘तंबाखूचा घास,जीवनाचा नाश’’, ‘‘तंबाखूला नाही म्हणा, आरोग्याची नाती जोडा’’,‘‘तंबाखूचा त्याग करा,जीवनात आनंद भरा’’ अशा प्रभावी घोषणांमुळे संपूर्ण परिसरात जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राकेश नेवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात तंबाखूचा मानवी आरोग्यावर होणारा घातक परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. उपक्रमात सुमारे २०० नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने डॉ. ललितकुमार धोका, डॉ. मिलिंद सोनावणे, डॉ. प्रफुल्ल तामसकर, डॉ. शिवमूर्ती खंडाळकर, डॉ. मोनिका दहिवलकर, डॉ. प्राची हेंद्रे, डॉ. विनायक गवळी, डॉ. धनराज हेळंबे यांच्यासह संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×