Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वादाचा बदला घेण्यासाठी टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोड

वादाचा बदला घेण्यासाठी टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोड

दोघांवर वार, शिवाजीनगरमधील घटना

marathinews24.com

पुणे – जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी टोळक्याने दोघांवर वार करून परिसरातील वाहनांची तोडफोड केल्याची घटना ७ जूनला रात्री साडेबाराच्या सुमारास शिवाजीनगरमधील आशियाना इमारतीसमोर घडली आहे. टोळक्याने परिसरात राडा घालून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौघांना अटक केली असून, पसार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ट्रक चालकाने रस्त्यावरच वळण घेतले, मोटार चालकाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

आदित्य उर्फ बारक्या राजेश वडसकर (वय २२), अर्थव अजय कदम (वय २४), रोहन संतोष शिंदे (वय २३), प्रथम नितीन मोहिते (वय २१ सर्व रा. शिवाजीनगर गावठाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. समीर शेख (वय ४८ रा. शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. टोळक्याच्या हल्ल्यात त्यांचा मुलगा आणि पुतण्या गंभीररित्या जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयाज फिरोज याच्यासोबत झालेल्या वादावादीचा बदला घेण्यासाठी टोळक्याने ७ जूनला रात्री साडेबाराच्या सुमारास शिवाजीनगर गावठाण परिसर गाठला. त्याठिकाणी फिर्यादी समीर शेख यांचा मुलगा आणि पुतण्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने हत्याराने वार करून गंभीररित्या जखमी केले.

त्यानंतर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. वाहनांची तोडफोड करीत नुकसान केले. त्यासोबत शस्त्रबंदी आणि जमावबंदी असतानाही टोळक्याने नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे, सहायक आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पांढरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×