Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा आज मेळावा

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा आज मेळावा

मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत प्रामुख्याने चर्चा होणार

marathinews24.com

पुणे – पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा मेळावा व नवीन कार्यकारिणी निवड सभा रविवारी (ता. ८)  नायगाव येथील श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश वाळुंजकर व उपाध्यक्ष वसंत शिंदे यांनी दिली.

औद्योगिकनगरीत अतिसाराचे बाधित वाढले – सविस्तर बातमी 

मेळाव्याला आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबूराव वायकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, संघटनेचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानोबा घोणे, अशोक गायकवाड, राजेंद्र वाव्हळ आदींसह पुणे जिल्ह्यातील सर्व आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत प्रामुख्याने चर्चा होईल.

जिल्ह्यातील सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मावळ तालुका उपाध्यक्ष जीवन गायकवाड, ज्येष्ठ सल्लागार राजेंद्र कांबळे, कार्याध्यक्ष महादू पोटफोडे, सरचिटणीस सुखदेव गोपाळे, भाऊसाहेब कल्हाटकर, बाळासाहेब घाडगे आदींनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×