Breking News
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ग्रीन सोल्युशन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कारकृतज्ञ भावनेची जोड देत प्रसाद नगरकर यांनी आई-वडिलांना भेट दिली आलिशान ‘मर्सिडीज-मेबॅक’दैनिक प्रभातचे छायाचित्रकार संदीप घोडके यांचे निधनवारकरी संप्रदयाचा अपमान, विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यातहल्ल्याची १० महिन्यांपुर्वी तयारी, ५ आरोपी अटकेतनागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेत उपलब्ध करुन द्याव्यातसिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकारसमाज कल्याण विभागाच्या विविध योजना वंचितांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावीचांगल्या परताव्याचे आमिष पडले ५ लाखांनाआंबेगावात घरफोडी, रोकडसह दागिने चोरीला

वादातून तरूणावर वार, मांजरी बुद्रूकमधील घटना

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

टोळक्याविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या वादातून टोळक्याने तरूणाला गाठून त्याच्यावर शस्त्राने वार करीत गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना ६ जूनला रात्री अकराच्या सुमारास मांजरी बुद्रूक परिसरातील माउली ग्राफिक्समध्ये घडली आहे. याप्रकरणी टोळक्याविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर हनुमंत सोनमाळी (वय ३३, रा. कृष्णकुंज सोसायटी, कुंजीरवस्ती, मांजरी बुद्रूक) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी यश मोडक, गौरव नेटके, सौरभ नेटके, ओंकार भोसले, निखील कांबळे यांच्यासह इतर आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वादाचा बदला घेण्यासाठी टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि ज्ञानेश्वर सोनमाळी यांच्यात काही दिवसांपुर्वी वादावादी झाली होती. त्याच रागातून ६ जूनला रात्री अकराच्या सुमारास टोळक्याने माउली ग्राफिक्समध्ये ज्ञानेश्वरला गाठले. त्याला बेदम मारहाण करीत वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यासोबत त्याच्या मित्रानाही शस्त्राचा धाक दाखवून धमकाविल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×