Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण

येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण

कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – येरवडा कारागृहात दोन कैद्यांनी एकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन खून केल्याची घटना ताजी असतानाच एका कैद्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. कैद्याने एकाला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. गंभीर दुखापत केल्याप्रकरणी एका कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण – सविस्तर बातमी

देवकरप्पा गराळे (वय ६५) असे गंभीर जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. गराळे याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कैदी फजिल अहमद अब्दुलकयुम अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा कारागृहातील हवालदार प्रकाश भोसले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गराळे आणि अन्सारी यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. कारागृहातील चांगल्या वर्तणुकीमुळे दोघांना खुल्या कारागृहात काम देण्यात आले आहे. ५ जानेवारी रोजी खुल्या कारागृहातील बराक क्रमांक एक परिसरात गराळे आणि अन्सारी यांच्यात वाद झाला. वादातून अन्सारीने गराळे याच्या चेहऱ्यावर ठोसे मारले. ठोसे मारल्याने गराळे फरशीवर पडला. जखमी झालेल्या गराळे याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीत गराळे यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ते गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड तपास करत आहेत.

गेल्या महिन्यात येरवडा कारागृहात खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सराइताने एकाला फरशीच्या तुकड्याने मारहाण केली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कैद्याचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. येरवडा कारागृहातील हाणामारीच्या घटना रोखण्यासाठी आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कारागृहातील नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून कैद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×