Breking News
पुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला न्यायालयाचा दणका; २० वर्ष कारावासाची सुनावली शिक्षा

कोट्यावधींची गंडा घालणाऱ्या सौरभ कुलकर्णीला ७ दिवसांची पोलीस कोठडी

तपास ठरला महत्वपूर्ण ; बीड पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने २० वर्षे कारावसाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत बीड पोलिसांनी केलेला तपास महत्वपूर्ण ठरला आहे. गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपुरी येथे दि. ४ मे २०२२ रोजी सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पिंक पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले यांनी केला होता.

एमडीला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने डॉक्टरांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपत्रातील सर्व साक्षीदार तसेच तपास कामी गोळा केलेले सर्व पुरावे यावरून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुंदर निवृत्ती तायड, (वय ३४ रा. रामपुरी ता. गेवराई ) याला सत्र न्यायालय, बीड यांनी दि. १२ जानेवारी २०२६ रोजी २० वर्ष कारवास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यात सहायक पोलिस निरीक्षक। मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हवालदार गव्हाणे मॅडम यांनी मोलाची कामगिरी केली आहे. चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी अखेर पोलिसांनी केलेल्या तपासाला यश मिळाले असून चिमुकलीला न्याय मिळवून देण्याचे काम बीड पोलिसांनी केले आहे.

निकालामुळे बीड पोलिसांवरील विश्वास मजबूत झाला आहे. ही।कामगिरी कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. मदतनीस म्हणून सहायक पोलीस फौजदार भगवान खाडे, पोह. महेश झिकरे, अंमलदार ज्योती साळुंखे या टीमने मदत केली होती. गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपी यांच्याविरुद्ध गुन्ह्याचे दोषारोप पत्र सत्र न्यायालय बीड येथे दाखल करण्यात आले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×