Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

‘हिंद-दी-चादर’ समागमात नऊ समाजांचे सामाजिक ऐक्य

‘हिंद-दी-चादर’ समागमात नऊ समाजांचे सामाजिक ऐक्य

गुरु तेग बहादूरांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त सामाजिक सलोख्याचे दर्शन

marathinews24.com

नवी मुंबई – “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात नऊ समाजांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. विविध समाज, पंथ आणि घटक एकत्र येत सामाजिक ऐक्याचे प्रभावी दर्शन घडले.

खारघरमध्ये ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम; भव्य पार्किंग व्यवस्थेची तयारी – सविस्तर बातमी 

या समागमात सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीयम, उदासीन तसेच संत नामदेव महाराजांच्या वारकरी (भगत नामदेव) संप्रदायातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. समागमात सर्व समाजातील प्रतिनिधींनी उपस्थित राहून एकता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. श्रद्धा, सेवा आणि समतेच्या विचारांवर आधारित कार्यक्रमात सर्वांनी शांततेत आणि शिस्तीत सहभाग घेतला.

कार्यक्रमस्थळी सर्व समाजांनी परंपरा, संस्कृती आणि धार्मिक मूल्यांचा सन्मान राखत शांततेत सहभाग घेतला. विविध समाजांच्या उपस्थितीमुळे हा समागम केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीनुसार समता व मानवतेचा विचार अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध समाजांच्या सहभागामुळे हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोख्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×