Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

तरुणांच्या तत्परतेमुळे रोकड लुटीचा डाव उधळला

खराडी, हडपसरमध्ये फ्लॅटमधून लॅपटॉप चोरीला

चंदननगर परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – बँकेतून निघालेल्या तरुणाकडील १५ लाख रुपयांची रोकड लुटण्याचा डाव नागरिकांच्या तत्परतेमुळे उधळला गेला. चंदननगर परिसरात ही घटना घडली. प्रसंगावधान राखून तरुणाने विरोध केल्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

पुण्यात ट्रकच्या धडकेत ३ वर्षीय मुलाचा मृत्यू, वडिल गंभीर – सविस्तर बातमी

याबाबत एका तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २३ वर्षीय तरुण एका खासगी कार्यालयात नोकरी करतो. ताे वडगाव शेरी परिसरात राहायला आहे. २७ फेब्रुवारी रोजी कार्यालयीन कामकासाठी त्याला बँकेतून रोकड काढून आणण्यास सांगितले होते. रोकड काढल्यानंतर तो दुपारी दोनच्या सुमारास वडगाव शेरीतील श्री हनुमान मंदिर परिसरात आला. त्या वेळी दोन दुचाकीवरून चौघे जण आले. एका चोरट्याने तरुणाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. तक्रारदार तरुणाला धमकावून चोरट्याने त्याच्याकडील १५ हजारांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. तरुणाने प्रसंगावधान राखून चोरट्याला धक्का दिला. दुचाकीवरील दोन चोरटे रस्त्यात पडले. त्यानंतर तक्रारदार तरुणाने दुचाकी सुरू केली. त्याने ऑक्सिजन पार्कजवळील एका चहाच्या टपरीवर दुचाकी थांबविली. तरुणाचा पाठलाग करत दुचाकीवरून चोरटे तेथे आले. त्यांनी तरुणाला मारहाण करून रोकड असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला.

त्याचा आरडाओरडा ऐकून नागरिक तेथे जमा झाले. नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वार चोरटे तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×