नवले पुलाजवळील घटना
marathinews24.com
पुणे – नवले पुलाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठिमागून दिलेल्या धडकेत तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर, वडिल गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. नवले पुलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या रोडवर माणिक मोती कॉम्प्लेक्सजवळ ही घटना घडली. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.अंश भाऊरंग सोनकांबळे (वय ३, रा. अंजनीनगर, कात्रज) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, त्याचे वडिल भाऊरंग सोनकांबळे हे गंभीर जखमी केले आहेत. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बस प्रवासात रोकड चोरली; तर ज्येष्ठाची सोनसाखळी हिसकावली – सविस्तर बातमी
पोलिसांच्या माहितीनुसार, भाऊरंग हे देखील ट्रक चालक असून, ते कात्रज परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, ते शनिवारी सकाळी आठच्या सुमारास मुलगा अंश याला घेऊन नवले ब्रिजकडे काही कामानिमित्त आले होते. ते काम संपवून साडे आठच्या सुमारास पुन्हा नवले ब्रिजकडून कात्रजकडे निघाले होते. तेव्हा माणिक मोती कॉम्प्लेक्सजवळ पाठिमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत बाप-लेक खाली कोसळले. यात गंभीर मार लागल्याने अंश याचा मृत्यू झाला. तर, भाऊरंग हे गंभीररित्या जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी माहिती घेऊन पाहणी केली. दरम्यान, ट्रक चालकाला नोटीस देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत.






















