बस प्रवासात रोकड चोरली; तर ज्येष्ठाची सोनसाखळी हिसकावली

पुण्यात मॉर्निंग वॉक करणार्‍या जेष्ठाची चैन हिसकावली

गर्दीत धक्का देऊन चोरट्यांनी मारला डल्ला

marathinews24.com

पुणे – पीएमपी बसने प्रवास करत असताना गर्दीत धक्का देऊन चोरट्यांनी खिशातील ५० हजारांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार विश्रांतवाडीत घडला. तर, खडकीत बसची वाट पाहणाऱ्या ज्येष्ठाच्या गळ्यातील ८३ हजारांची सोन साखळी चोरून नेली.

नागरिकांमुळे १५ लाखांच्या रोकड लुटीचा डाव फसला – सविस्तर बातमी

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात ७३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार तीन दिवसांपुर्वी दुपारी घडली.

तक्रारदार धानोरी परिसरात राहण्यास आहेत. ते दुपारी बाराच्या सुमारास पीएमपी विश्रांतवाडी ते कोथरूड या पीएमपी बसने प्रवास करत होते. तेव्हा बसमध्ये गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत त्यांना धक्का देत त्यांच्या खिशातील ५० हजारांची रोकड चोरून नेली. तक्रारदार खाली उतरल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आले. अधिक तपास पोलिस करत आहेत.

तसेच, दुसऱ्या घटेत वाकडेवाडी बस स्टँडमध्ये ६४ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील ८३ हजार रुपयांची सोन साखळी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे नाशिक येथील असून, ते गावाला परत निघाले होते. त्यामुळे ते वाकडेवाडी बस स्टँडमध्ये बसची वाट पाहत थांबले होते. तेव्हा त्यांच्या गळ्यातील सोन साखळी अज्ञातांनी चोरून नेली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×