Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

नागरिकांमुळे १५ लाखांच्या रोकड लुटीचा डाव फसला

प्रेम, धमक्या अन आत्‍महत्‍या; फाटलेल्या चिठ्ठीतून उलगडला महिलेवरील अन्याय

चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बँकेतून काढलेली १५ लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा चौघांनी पाठलाग करून त्याच्याजवळील रोकड लुटून नेण्याचा प्रयत्न नागरिकांमुळे फसला. तरुणाला हत्याराच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने पळ काढला. तरुण एका पान टपरीवर थांबल्यानंतर देखील चोरटे त्याचा पाठलागकरत तिथे आले. त्यांनी त्याला मारहाण करून रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिक जमल्यानंतर चोरटे पसार झाले. चंदननगर परिसरात ही थरारक घटना घडली.

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची ५७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाने चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानूसार, चौघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तीन दिवसांपुर्वी भरदुपारी ही घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण एका खासगी कार्यालयात नोकरी करतो. कार्यालयीन कामकासाठी त्याला बँकेतून रोकड काढून आणण्यास सांगितले होते. त्यानूसार, तरुण दुपारी बँकेत रोकड काढण्यासाठी गेला. तेथून त्याने १५ लाख रुपयांची रोकड काढली आणि ती सॅकमध्ये ठेवून तो पुन्हा कार्यालयात येत होता. तेव्हा वडगाव शेरी येथील हनुमान मंदिर परिसरात आल्यानंतर दोन दुचाकीवरून पाठिमागून पाठलाग करत आलेल्या चोरट्यांनी त्याच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. एकाने त्याला हत्याराचा धाक दाखविला. हा सर्व प्रकार चालत्या गाडीवर सुरू होता. तरुणाने मात्र, बॅग हिसकावणाऱ्या चोरट्यांना हिसका देऊन त्यांना ढकलले. त्यामुळे ते दोघेही खाली कोसळले. त्यानंतर तरुणाने त्याची दुचाकी सुसाट वेगात पळवत ऑक्सीजन पार्कचे गल्लीतील एका चहाच्या टपरीवर थांबला. काही वेळाने पुन्हा हे चोरटे त्याचा पाठलागकरत तिथे आले.

त्यांनी तरुणाला धमकावत मारहाण केली. हत्याराचा धाक दाखवून त्याच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण, तरुणाने मोठ्या आरडाओरडा केला. त्यामुळे याठिकाणी नागरिक जमा झाले. त्यांनी काय झाले असे विचारण्यास सुरूवात करताच चोरटे तेथून पसार झाले. त्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास चंदननगर पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×