Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची ५७ लाखांची फसवणूक

Pune Investment Fraud

सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी शहरातील तीन व्यक्तींना शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तब्बल ५७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूकीच्या घटना पुन्हा वाढल्याचे दिसत आहे.

ज्येष्ठाची १० कोटींची फसवणूक: सायबर चोरटे अटकेत – सविस्तर बातमी

पहिल्याघटनेत ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात मोबाईल धारक, लिंक धारक तसेच ॲप आणि बँकेच्या खाते धारकांवर आयटी ॲक्टसह इतर कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार जुलै ते ऑगस्ट २०२५ या एक महिन्याच्या कालावधीत घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार संजय पार्क येथे राहण्यास आहेत. तक्रारदारांना सायबर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवून शेअर ट्रेडिंगची माहिती दिली. त्यानंतर फोनद्वारे संपर्क साधत त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष दाखविले. एक ॲपद्वारे त्यांना शेअरर्सची माहिती देखील देण्यात आली. त्यानंतर त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांनी वेगवेगळ्या खात्याद्वारे एकूण ३९ लाख ७ हजार २०० रुपये पाठवले. मात्र, नंतर त्यांना परतावा किंवा मुळ रक्कम न देता त्यांची फसवणूक केली.

दुसऱ्या घटनेत अशाच पद्धतीने एका ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चोरट्यांनी ८ लाख ७५ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात सायब चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून केवळ २२ दिवसात सायबर चोरट्यांनी पैसे उकळले आहेत. तसेच, विश्रांतवाडी भागातील ४४ वर्षीय व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याच्या आमिषाने ९ लाख ८ हजार ८६१ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×