Breking News
वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्नएसएनडीटी मध्ये  महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती तर्फे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्नडी.लिट.मुळे स्वयंपूर्ण गोवे उपक्रमाला बळ-मुख्यमंत्री प्रमोद सावंतकारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यूकात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

ज्येष्ठाची १० कोटींची फसवणूक: सायबर चोरटे अटकेत

ज्येष्ठाची १० कोटींची फसवणूक: सायबर चोरटे अटकेत

‘डिजिटल ॲरेस्टची दिली होती धमकी

marathinews24.com

पुणे – डिजिटल ॲरेस्टची भीती दाखवून शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची पावणे अकरा काेटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली. हर्षद सुभाष धनतोले (वय २३), समर्थ सुरेश देशमुख (वय २४, दोघे सध्या रा. कर्वेनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपी धनतोले, देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याची बतावणी केली होती.

पूर्वसूचना न देता रस्ते खोदाई; गॅस कंपनीसह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

काळ्या पैशांच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात सीबीआयकडून अटक (डिजिटल ॲरेस्ट) करण्यात येणार असल्याची भीती दाखविण्यात आली होती. या प्रकरणात कुटुंबीयांनाही अटक करण्यात येणार असल्याचे सांगून आरोपींनी ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करावी, असे सांगितले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात दहा कोटी ७४ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ज्येष्ठ नागरिकाने ज्या बँक खात्यात पैसे भरले हाेते. त्या खात्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली, तसेच चोरट्यांनी शहरातील काही एटीएममधून पैसे काढले होते.

पोलिसांनी संबंधित एटीएममधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. सायबर पोलिसंच्या पथकाने तपास करनु आरोपी धनतोले अणि देशमुख यांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख ७८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपींच्या खात्यातील ४० लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, सहायक निरीक्षक अर्चना कटके, उपनिरीक्षक सुशील डमरे, अजित बढे, कृष्णकांत देसाई, रवींद्र साळवी, जान्हवी भडेकर, गंगाधर काळे, नवनाथ कोंडे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×