Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

पूर्वसूचना न देता रस्ते खोदाई; गॅस कंपनीसह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

खराडी, हडपसरमध्ये फ्लॅटमधून लॅपटॉप चोरीला

श्री संत ज्ञानेश्वर पादुका चौकात वाहतूक कोंडी

marathinews24.com

पुणे – वाहतूक पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता श्री संत ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात रस्ते खोदाई करुन वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी खासगी गॅस पुरवठदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजीनगर भागातील श्री संत ज्ञानेश्वर पादुका चौकातून माॅडर्न महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर २७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास गॅस पुरवठादार कंपनीच्या ठेकेदाराने खोदाई सुरू केली.

पुण्यात हुंडाबळीची सत्त्वपरिक्षा – सविस्तर बातमी 

दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने पालकही सकाळी परीक्षा केंद्रावर निघाले होते. या भागात शाळा, महाविद्यालय असल्याने कोंडी झाली. नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियोजन केले. वाहतूक विस्कळीत झाल्याने सकाळी कामावर निघालेले नागरिक, तसेच पालकांना कोंडीत अडकून पडावे लागले होती.

पूर्वसूचना न देता अचानक गॅस पुरवठादार कंपनीने ठेकेदारामार्फत रस्ते खोदाई सुरू केल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. रस्ते खोदाई करण्यापूर्वी वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालय, तसेच संबंधित भागातील वाहतूक विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, गॅस कंपनीने वाहतूक पोलिसांकडून परवानगी घेतली नसल्याने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×