Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यात हुंडाबळीची सत्त्वपरिक्षा

उच्च शिक्षितांसह गर्भश्रीमंतामध्ये वाढती हाव

marathinews24.com

पुणे – सामाजिक रितीरिवाजाच्या काही अनिष्ट परंपरा मोडीत काढण्यासाठी अनेकांनी प्राधान्य दिले आहे. प्रत्यक्षात मात्र, अमंलबजावणीच होत नसल्यामुळे हुंडाबळीसारखे प्रकार वाढीस लागले आहे. प्रामुख्याने उच्चशिक्षितांसह श्रीमंत व गर्भश्रीमंतांकडूनच महिलांना सर्वाधिक त्रास देत आत्महत्येस भाग पाडले जात असल्याचे दिसून आले आहे. हुंडाबळीतून मागील वर्षी वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर राज्यभर राळ उडाली होती. अशीच एक घटना पुन्हा बाणेरमध्ये घडली आहे. हुंडा, माहेरहून २१ तोळ्यांची मागणी वडिलांना झेपणार नाही, त्यामुळे सासरच्या त्रासाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या तीनच महिन्यात नवविवाहितेने इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले आहे.

येरवड्यात सराईत गुंडाची पोलिसांनी काढली धिंड – सविस्तर बातमी

हुंडा व मानपानासाठी सासरच्यांकडून महिलांना छळाला सामोरे जावे लागत आहे. त्याशिवाय हुंड्यासाठी मानसिक त्रास सहन करून जीव देण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुण्यात हुंड्यासाठी महिलेचा खून, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण, छळाच्या घटनांनी सामाजिक एकतेला तिलांजली दिली जात आहे. सास्कृंतिक शहर असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस महिलांच्या छळवणूकीच्या तक्रारीत वाढ होत चालली आहे. महिलांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या प्रकारांमुळे सामाजिक विषमता वाढीस लागली आहे. हुड्यांसाठी आणि मानपानासाठी विवाहित महिलांचा छळ केल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. लग्नात मानपान केला नाही, घर, गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, स्वंयपाक चांगला बनविता येत नाही, वंशाला दिवा (मुलगा) होत नाही, संसार करता येत नाही अशा कारणांसाठी महिलांचा छळ केला जात आहे.

पती-पत्नीचे वाद मिटविण्यासाठी पोलिसांच्या भरोसा सेलद्वारे महिला सहायता कक्षाद्वारे समुपदेशन केले जाते. पती-पत्नीचे वाद मिटविणे, कौटुंबिक अडचणींवर मार्ग काढणे, जेष्ठ महिलांसह बालकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यावर भर दिला जातो. प्रत्यक्षात मात्र, कौटुंबिक हिंसाचारामुळे घडणार्‍या घटनांवर विवेचन केले जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महिलांमध्ये नैराश्य येउन आत्महत्यासारखे मार्ग पत्करला जात आहे. दरम्यान, काही घटनांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी खोट्या असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, काही दाम्पत्यांना संसारात कोणाचीही लुडबूड नको असते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होतात. त्यानंतर थेट खूनाचा प्रयत्न, घटस्फोट किंवा आत्महत्या यासारख्या घटनांमुळे चिंतेत भर पडली आहे.

सासरी नांदण्यासाठी गेलेल्या काही नवविवाहितांना सासरच्या मंडळींचा जाच सहन करावा लागतो. एकीकडे आई-वडिलांनी लग्नात केलेला खर्च फिटण्याआधीच मुलीला त्रास देण्यास सुरूवात होते. नवीन मोटार, हुंडा, सोनं, रोकड, फ्लॅटसाठी पैसे, दुकानासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी नवविवाहितेच्या छळाचे टोक गाठले जाते. त्यामुळे अवघ्या २० ते २५ वयोगटात आयुष्य सुरू झालेल्या मुलींनी जीव दिल्याच्या कित्येक घटना घडत आहेत. दरम्यान, सततच्या कुरबुरी आणि मानसिक त्रासाला कंटाळून कौटुंंबिक कलह वाढले आहेत. त्यामुुळे नोकरी व्यवसाय करताना अनेकजण मानसिक ताणात असल्याचेही दिसून आले आहे. हुंड्याची अनिष्ट प्रथा बंद करून सासरच्या मंडळींनी मुलीप्रमाणेच सुनांचा सांभाळ केल्यास अनपेक्षित घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. अत्याधुनिक काळात नवविवाहित दाम्पत्याने समजुतीने वागल्यास कौटुंबिक ताण-तणाव कमी होण्यावर भर देणे आवश्यक आहे.

सोरतापवाडीच्या महिला सरपंचाच्या घरात ‘हुंडाबळी‘

पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी गावच्या महिला सरपंचाच्या घरात सुनेने हुंड्यासाठी होणार्‍या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जानेवारी २०२६ मध्ये घडली होती. याप्रकरणी सरपंच महिलेसह चौघांविरुद्ध ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दीप्ती रोहन चौधरी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दीप्तीच्या आईने ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीप्तीचा विवाह २०१९ मध्ये झाल्यानंतर माहेरून पैसे आणण्याची तिचा छळ सुरू झाला. वेळोवेळी पैसे देऊनही दीप्तीचा छळ सुरू होता. त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे दीप्तीच्या आईने फिर्यादीत म्हटले होते.

वैष्णवी हगणवे, दीप्ती चौधरी, आता गंगा बेंबळकर

लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच सासरचा जाच सुरू झाला. त्यानंतर वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हुंडाबळीमुळेच तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोरतापवाडीत महिला सरपंचाच्या सुनेलाही हुंडाबळीला सामोरे जावे लागले. दीप्तीनेही गळफास घेत जीवन संपवले. त्यानंतर आता उच्चशिक्षित आणि गर्भश्रीमंत असलेल्या कुटूंबियाच्या जाचाला कंटाळून गंगा बेंबळकर हिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना १९ फेबु्रवारी २०२६ रोजी घडली आहे. तिन्हीही महिलांचे वय २२ ते २७ वयोगटात असून, त्यांनी जाचाला कंटाळूनच टोकाचे पाउल उचलल्याचे स्पष्ट झाले

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×