Breking News
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजीकेंद्रीय सहकार मंत्रालयाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात २९ जून ते ६ जुलै २०२६ दरम्यान ‘सहकार सप्ताह’चे आयोजनटीमवर्क, अहोरात्र मेहनतीने १६ दिवसांत चार्जशीट-पोलीस अधीक्षकपुण्यात सॉफ्टवेअर कंपनीला २ कोटींचा चुनाकल्याणीनगरमध्ये दुकानातून रोकड चोरीलाटँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघड

येरवड्यात सराईत गुंडाची पोलिसांनी काढली धिंड

येरवड्यात सराईत गुंडाची पोलिसांनी काढली धिंड

येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात दहशत माजवून गाड्यांची केली होती तोडफोड

marathinews24.com

पुणे – शहरातील येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात दहशत माजवून गाड्यांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुंडाची शुक्रवारी (दि. २७) धिंड काढण्यात आली. या गुंडाला जेरबंद केल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सुलतान रिजवान शेख (वय २०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) हे या गुंडाचे नाव आहे. तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

बनावट ओैषधाची विक्री प्रकरण; पुणे, मुंबई, नागपूरमधील वितरकांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

आरोपी शेख याच्याविरुद्ध यापूर्वी २२ गुन्हे दाखल आहेत. परिसरात दहशत माजवण्यासाठी त्याने लक्ष्मीनगरमधील वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर तो पसार झाला होता. त्याच्या नेमक्या ठावठिकाण्याची माहिती लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. सुलतानने वाहने फोडण्याचे अनेक गुन्हे केले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याच्या दहशतीमुळे स्थानिक रहिवासी त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास धजावत नव्हते. पोलिसांनी शुक्रवारी त्याची लक्ष्मीनगर परिसरातून धिंड काढली. तसेच, त्याच्याविरुद्ध नागरिकांनी निर्भीडपणे तक्रार द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×