Breking News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजीकेंद्रीय सहकार मंत्रालयाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात २९ जून ते ६ जुलै २०२६ दरम्यान ‘सहकार सप्ताह’चे आयोजनटीमवर्क, अहोरात्र मेहनतीने १६ दिवसांत चार्जशीट-पोलीस अधीक्षकपुण्यात सॉफ्टवेअर कंपनीला २ कोटींचा चुनाकल्याणीनगरमध्ये दुकानातून रोकड चोरीलाटँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकी

बनावट ओैषधाची विक्री प्रकरण; पुणे, मुंबई, नागपूरमधील वितरकांविरुद्ध गुन्हा

बनावट ओैषधाची विक्री प्रकरण; पुणे, मुंबई, नागपूरमधील वितरकांविरुद्ध गुन्हा

‘एफडीए’च्या तपासणीत उघड

marathinews24.com

पुणे – ओैषध निर्मिती कंपनीच्या नावे बनावट ओैषधांची विक्री केल्या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पुण्यातील सदाशिव पेठ, तसेच मुंबई, नागपूर, रायगड येथील पाच ओैषध वितरकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफडीए) केलेल्या तपासात ही बाब उघडकीस आली आहे. ‘एफडीए’तील औषध निरीक्षक श्रुतिका जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ‘एफडीए’च्या पथकाने २८ जुलै २०२५ रोजी सदाशिव पेठ येथील मे. मैत्री फार्मास्युटीकल्स येथे तपासणी केली. तेथून ॲल्बुरेल आणि रिच्यूएक्सरेल या औषधांचे नमुने घेऊन ते शासकीय विश्लेषक, मुंबई कार्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले.

सांडपाणी नाल्यात सोडल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

शासकीय विश्लेषकांच्या अहवालानुसार ॲल्बुरेल या औषधाच्या चाचणीत दोष आढळले आहे. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या कलम १७ (ब) अन्वये बनावट घोषित करण्यात आले आहे. तपासादरम्यान या बनावट औषधाची खरेदी आणि विक्री व्यवहारात मैत्री फार्मास्युटीकल्स (सदाशिव पेठ), श्री साई लॉजिस्टिक ( नागपूर) , एम/एस नेक्सस लाईफकेअर प्रा. लि.( दादर (पूर्व), मुंबई), एन. आर एक्स डिस्ट्रीब्युटर्स एलएलपी (सायन, मुंबई), एम/एस आरआरटी फार्मा (कामोठे, रायगड) या वितरकांनी संगनमत करून बनावट औषधांची खरेदी आणि विक्री केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बनावट औषधावर उत्पादक म्हणून नमूद असलेल्या रिलायन्स लाईफ सायन्स प्रा. लि.(नाशिक) यांनी लेखी पत्राद्वारे संबंधित ‘बॅच’चे उत्पादन त्यांनी केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे औषध पूर्णतः बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरआरटी फार्माचे मालक रितेश ठोंबरे यांच्याविरुद्ध यापूर्वीही बनावट औषध विक्री प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत. वैद्यकीय उपचारांमध्ये वापरले जाणारे ॲल्ब्युरेल हे महत्त्वाचे औषध आहे. बनावट स्वरूपात या ओषधाची विक्री करणे ही गंभीर बाब आहे.

एकप्रकारे हा रुग्णांच्या जिवाशी खेळ आहे. शासनाचीही आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरातील औषध विक्रेत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद औषधांची माहिती त्वरीत प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे औषध यकृत, तसेच अन्य गंभीर आजारांसाठी वापरले जाते असल्याची माहिती देण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×