Breking News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजीकेंद्रीय सहकार मंत्रालयाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात २९ जून ते ६ जुलै २०२६ दरम्यान ‘सहकार सप्ताह’चे आयोजनटीमवर्क, अहोरात्र मेहनतीने १६ दिवसांत चार्जशीट-पोलीस अधीक्षकपुण्यात सॉफ्टवेअर कंपनीला २ कोटींचा चुनाकल्याणीनगरमध्ये दुकानातून रोकड चोरीलाटँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकी

सांडपाणी नाल्यात सोडल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गृहप्रकल्पाच्या बांधकामा दरम्यान सांडपाणी नाल्यात सोडल्याप्रकरणी मुंढव्यातील एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पतीच्या छळामुळे पत्नीची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढव्यातील केशवनगर भागात २०२४ पासून एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची निवास व्यवस्था (लेबर कॅम्प) करण्यात आली आहे. नियमानुसार सांडपाणी, तसेच स्वच्छतागृहातील पाण्याची योग्यरित्या विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिकाने बांधकामात वापरले जाणारे रसायनमिश्रित सांडपाणी, तसेच स्वच्छतागृहातील पाणी जवळच असलेल्या नाल्यात सोडल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.

गेल्या काही महिन्यांपासून या सांडपाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये डेंग्यू, मलेरिया, तसेच जलजन्य आजारांची भीती वाढली आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी तक्रारदाराने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनीक यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×