Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

पुण्यात बालेवाडीतील बारमध्ये तरुण-तरुणीचा गोंधळ

फुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला

पोलिसांना शिवीगाळ, महिला पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला चावा

marathinews24.com

पुणे – शहरातील बालेवाडी परिसरात असलेल्या बारमध्ये पोलिसांशी वाद घालून गोंधळ घालणाऱ्या तरुण-तरुणीवर बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ करणे, महिला अधिकाऱ्याच्या हाताला चावा घेऊन जखमी केल्याचा आरोप या दोघांवर आहे. मानसी चंपालाल परिहार ( २४, रा. पिंपळे सौदागर) आणि युवराज निलेश परतानी ( २४, रा. पाषाण ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी १० मार्चला पुण्यात राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडीत ‘एजंट जॅक्स’ बारमध्ये ३ मार्चला रात्री पावणे बाराच्या वाजता भांडण झाल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली. त्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे व इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी बारमध्ये तरुण- तरुणी मोठ्याने आरडा ओरडा करत असल्याचे पोलिसांना आढळले. दोघांनी बारमध्ये मारहाण झाल्याचा दावा करत सीसीटीव्ही फुटेज तात्काळ देण्याची मागणी केली. मात्र बार व्यवस्थापकाने फुटेजचे नियंत्रण मुंबईमध्ये असल्याने ते दुसऱ्या दिवशी उपलब्ध करून देऊ असे सांगितले. यानंतर संबंधित तरुण-तरुणी संतप्त झाले आणि पोलिसांशी वाद घालू लागले. नंतर हे दोघे बाणेर पोलिस ठाण्यात गेले. तेथेही गोंधळ घातला.

पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला असतानाही त्यांनी ऐकले नाही. दरम्यान दोघांच्या तोंडातून दारूचा वास येत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले. या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यावेळी मानसी परिहार हिने महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या उजव्या हाताला चावा घेऊन जखमी केले. याशिवाय परिहार हिने “मी आत्महत्या करून तुमच्या नावांचा उल्लेख करीन” तर युवराज परतानी याने “माझी पावर वापरून तुमच्या नोकऱ्या घालवतो” अशी धमकी दिली आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×