Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विभाग प्रमुखाची आत्महत्या

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

सिंहगड रस्ता भागातील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील सिंहगड रस्ता भागातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील दंत वैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुखांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. डाॅ. राजू पाटील (वय ४५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

पुण्यात तरुणीचा विनयभंग करणारा ‘डिलिव्हरी बाॅय’ गजाआड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाॅ. पाटील हे सिंहगड रस्ता भागातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात दंत वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख होते. शुक्रवारी दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. डाॅ. पाटील यांची पत्नी दुपारी घरी आली. तेव्हा त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. डाॅ. पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे. कामाच्या ताणामुळे आत्महत्या केल्याचे डाॅ. पाटील यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. डाॅ. पाटील यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×