आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चारेट्यांनी एकाची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कसबा पेठेत घरफोडी; ६ लाखाचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५४ वर्षीय तक्रारदार हे हडपसर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठविली. आभासी चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांच्या बँक खात्यात तक्रादाराने ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी १२ लाख ११ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×