ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत आगीची घटना

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात

marathinews24.com

पुणे – ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत तळमजल्यावरील कक्षात आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून तळमजल्यावरील कक्षातील रुग्णांना दुसऱ्या कक्षात दाखल करण्यात आले.

पुण्यात लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात – सविस्तर बातमी

ससून रूग्णालयाच्या जुन्या इमारतीत तळमजल्यावर वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये सोमवारी सकाळी आग लागली. या कक्षातील परिचारिकांच्या खोलीत नोंदणी पुस्तिका, व्हीलचेअर, ओैषधे, तसेच अन्य साहित्य ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर ससूनमधील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या नायडू केंद्राला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे बंब रुग्णालयात दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणली, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×