तिघांची २३ लाखांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – सायबर चोरट्यांनी पुणेकरांना लक्ष्य केले असून, विविध आमिषांसह शेअर मार्वेâटच्या नावाखाली ऑनलाईनरित्या लुट केली जात आहे. सातत्याने घटना वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, फसवणूकीच्या जाळ्यात उच्च शिक्षितांसोबत जेष्ठ नागरिक, महिलांना अडकवले जात असल्याचे दिसून आले आहे. अशाच तीन घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी २२ लाखांची फसवणूक केली आहे.
परदेशी चलन देण्याच्या आमिषाने साडेसात लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
बजाज फिन्सर्व्हमधून बोलत असल्याची बतावणी करीत कर्ज मंजुरीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ३७ वर्षीय महिलेला ५ लाख ८४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १ जुलै २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ कालावधीत आंबेगाव बुद्रूकमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करीत आहेत.
शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायरब चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला तब्बल १० लाख १६ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ११ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर २०२५ कालावधीत शिवाजीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय नागरिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर तपास करीत आहेत.
ऑनलाईन साहित्य प्रâॅन्चाइसी व कस्टमर मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ५२ वर्षीय नागरिकाला ५ लाख ८० हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना १७ ऑगस्ट २०२५ ते ३० जानेवारी २०२६ कालावधीत धानोरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकासह लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे तपास करीत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुणेकरांना सायबर चोरट्यांनी वेळोवेळी वेठीस धरल्याचे दिसून आले आहे. मात्र, सायबर पोलिसांकडून अद्यापही संबंधितांविरूद्ध कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.























