Breking News
ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीकडून गोळीबार; दोघे जखमीकेंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते लिंगभाव समावेशनावरील आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाचे उद्घाटनमराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण

पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी अल्प मुदतीच्या प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास व रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील नवीन बॅचेस १ एप्रिल २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या माध्यमातून १५ ते ४५ वयोगटातील पात्र उमेदवारांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. ८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू करण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यात अधिक उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमधील उपलब्ध सुविधा तसेच अत्याधुनिक प्रशिक्षण साधनांचा वापर करून तज्ञ मार्गदर्शकांकडून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा कार्यक्रम मागणी आधारित (डिमांड ड्रिव्हन) असून उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक प्रगत कौशल्ये उमेदवारांना प्रदान करण्यात येणार आहेत.

या प्रशिक्षणासाठी शिक्षण घेत असलेले, शिक्षण पूर्ण केलेले तसेच शिक्षण अर्धवट सोडलेले १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवती पात्र आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, यामुळे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन सु.रा. वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालयांशी संपर्क साधावा किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच (०२०) २६१३३६०३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×