Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

उपविभागीय अधिकारी २ लाखांची लाच घेताना जाळ्यात

लाचलुचपत

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

marathinews24.com

पुणे – नवीन बांधलेल्या इमारतीसाठी अंशत: पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५ लाखांच्या लाचेची मागणीकरून तडजोडीअंती २ लाखांची लाच घेताना जुन्न आंबेगावच्या उपविभागीय अधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. मंचरमधील कार्यालयातच ही सापळा कारवाई दुपारी झाली. गोविंद पंढरीनाथ शिंदे (वय ४६, रा. प्रभात रोड, मुळ. नाशिक) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.

पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारी प्रभाग स्तरावर दरमहा बैठका आयोजित करुन निकाली काढा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार – सविस्तर बातमी

जुन्नर-आंबेगाव उपविभाग येथे गोविंद शिंदे हे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी आहेत. तर तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची भागीदारीत फर्म आहे. या फर्मचे सर्व अधिकारी हे तक्रारदार यांच्याकडे आहेत. दरम्यान, त्यांनी पुणे-नाशिक महामार्गा लगत नारायणगाव येते जाँईट व्हेंचरमध्ये एक इमारत उभारली आहे. इमारतीचे ९० टक्के काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे त्यांनी इमारतीच्या बांधकामाचा अंशत: पूर्णत्वाचा दाखला मिळविण्यासाठी जुन्नर-आंबेगाव उपविभाग कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. यानंतर तो प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांनी नगररचना विभागाकडे पाठवून त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून स्वत:कडे प्रस्ताव राखून ठेवला. गेल्या आठवड्यात तक्रारदार हे प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी कार्यालयात गेले. तेव्हा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी त्यांच्याकडे अंशत: पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी ५ लाखांच्या लाचेची मागणी केली.

त्यानंतर तक्रारदार यांनी यासंदंर्भात एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी एसीबीने सापळा कारवाईत मंचरमधील उपविभागीय कार्यालयातच तजडोजीअंती शिंदे यांना २ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. कार्यालयातच झालेल्या या सापळा कारवाईच्या थरारानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×