Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

उपाहारगृहातील गॅस गळतीमुळे चार कामगार होरपळले

उपाहारगृहातील गॅस गळतीमुळे चार कामगार होरपळले

अग्निशमन दलाच्या जवानांनी रोखली गॅस गळती

marathinews24.com

पुणे – भारती विद्यापीठ परिसरातील एका उपाहारगृहात गॅसगळती झाल्यानंतर चार कामगार होरपळले. कामगारांना गंभीर दुखापत झाली नाही. भारती विद्यापीठ परिसरात नादब्रम्ह इडली हे उपाहारगृह आहे. शुक्रवारी सायंकाळी उपाहारगृहात गॅस गळती झाली. भडका उडाल्याने भटारखान्यात काम करणारे चार कामगार होरपळले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत नागरिकांनी कामगारांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

वैमनस्यातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

कामगारांच्या हात आणि पायाला किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस गळती रोखली. गॅस गळती झाल्यानंतर भडाका उडाला. उपाहारगृहातील छताचे नुकसान झाले, तसेच खिडक्यांचा काचा फुटल्या. जवानांनी उपाहारगृहाची पाहणी केली. तेथे व्यावसायिक वापराचे दोन सिलिंडर आढळून आले. गॅसगळती रोखल्यानंतर उपाहारगृहाची पाहणी केली. धोका नसल्याची खात्री केल्यानंतर जवान तेथून रवाना झाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×