Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

मिठाई विक्री दुकानातून ७० हजारांची रोकड चोरीला

व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीला

दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ७० हजारावर मारला डल्ला

marathinews24.com

पुणे – मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ७० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानाराम उमाजी चौधरी (वय ६४, रा. गंगाधाम, मार्केट यार्ड) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खराडीत तडीपार गुंडाची दहशत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे बिबवेवाडीतील भारतज्योती सोसायटी परिसरात मयूर स्वीट हे मिठाई विक्रीचे दुकान आहे. ३० मार्च रोजी चौधरी यांनी रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद केले. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडले. दरवाज्याचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. गल्ल्यात ठेवलेली ७० हजार रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. चोरट्यांनी दुकानातील मोबाइल संच, तसेच केशर डब्बा चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मिठाई, ओैषध विक्री, तसेच किराणा माल दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड लांबविल्याची घटना वाढल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×