Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुण्यात शस्त्र परवाना वितरणात घोटाळा नाही

तत्कालीन सीपी अमिताभ गुप्ता, डॉ. जालिंदर सुपेकरांना क्लीन चीट

marathinews24.com

पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या पार्र्श्वभूमीवर तब्बल १०० पेक्षा जास्त गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध मोक्का कारवाई करणारे पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या कालावधीत वितरित केलेल्या शस्त्र परवान्यामध्ये कोणताही बेकायदा प्रकार घडला नाही. संबंधित परवाना प्राधिकार्‍यांनी शस्त्र अधिनियमाच्या अटी व शर्थींचे पालन करूनच शस्त्र परवाने वितरित केले आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे गुप्ता आणि सुपेकर यांच्यावरील आरोपींना आता तिलांजली मिळाली आहे.

पर्यावरण संवर्धनादृष्टीने हरित ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनावर भर द्यावा-हनुमंत पाटील – सविस्तर बातमी

पुणे पोलीस आयुक्तपदी असताना अमिताभ गुप्ता यांच्यासह अपर आयुक्त जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणता शस्त्र परवान्याचे वितरित झाल्याचे आरोप झाले होते. मात्र, आता राज्य शासनाच्यावतीने यासंदर्भात खुलासा केला आहे. शस्त्र परवाना वितरणामध्ये बेकायदा प्रकार घडला नसल्याचे गृहविभागाने स्पष्ट केले आहे. अधिकार्‍यांनी सेवा कालावधीत ४३३ परवाने हे ‘शस्त्र अधिनियम १९५९ ‘ आणि ‘शस्त्र नियम २०१६’ मधील अटी व शर्तींचे पालन करूनच दिले आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून आरोपांचा सामना करणार्‍या दोन्ही वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मीडिया ट्रायल आणि आरोपांच्या फेर्‍यातून ते निर्दोष ठरले आहेत.

एसीबीकडे तक्रार नाही, अपसंपदाही नसल्याचे उघड

अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कोणतीही तक्रार दाखल नाही. तसेच त्यांनी वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येतील आरोपींना शस्त्र परवाना देण्यासाठी मदत केली नसल्याचेही स्पष्ट झाले. दरम्यान, सुपेकरांचे नातलग वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची एसीबीने चौकशी केली असून, त्यांच्याकडे कोणतीही ‘असंपदा’ असल्याचे पुरावे आढळले नसल्याचे एसीबीने स्पष्ट केले असून, त्यामुळे गृहविभागाने मालमत्ता प्रकरणाची चौकशी आता बंद केली आहे.

माजी महिला पोलीस महासंचालकांचे कटकारस्थान

कायदा सुव्यवस्थेसाठी काम करणारे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. मात्र, दलातील माजी महिला पोलीस महासंचालकांनी खात्याअंतर्गत धुसफुसीतून कारस्थान रचले. त्यानंतर विविध चौकशीच्या फेर्‍या सुरू करीत संबंधितांना त्रास दिला. आपल्यावरील दाखल गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी महिला पोलीस महासंचालकांनी अधिकार्‍यांना कोंडीत पकडल्याचे बोलले जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×