Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात अभिवादन

“शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन”

marathinews24.com

मुंबई – स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन परिसरात त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

‘नदी सुधारमुळे परिसरातील अधिवास नष्ट होतोय-सोमनाथ मुसुडगे – सविस्तर बातमी 

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना आजही अत्यंत प्रेरणादायी आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांना शक्ती व बळ मिळावे, तसेच तुळजाभवानीचे आशीर्वाद लाभावेत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

विधानमंडळात थोर विभूतींच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याची परंपरा सातत्याने जपली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींच्या कार्याची आठवण करून देणारे हे क्षण समाजाला नवी दिशा देणारे ठरतात, असे त्या म्हणाल्या.

यावेळी विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, खासगी सचिव अविनाश रणखांब, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष उडतेवार तसेच विधिमंडळ कर्मचारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठ्या प्रमाणात होत असून, त्यांच्या कार्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा, ऊर्जा आणि स्फूर्ती मिळत राहील, असा विश्वासही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×