अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील वानवडी परिसरातील लष्कराच्या एआयपीटीच्या गेस्ट हाऊसमधून शोकेशमध्ये ठेवण्यात आलेल्या ५ सिल्व्हर ट्रॉफी व दोन ब्रॉंझ सिल्व्हर ट्रॉफी अज्ञाताने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ट्रॉफींची किंमत सव्वा आठ लाख रुपये असल्याचे पुणे पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार १३ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीत घडला आहे.
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची १२ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे लष्करातील हवालदार आहेत. वानवडी परिसरात लष्कराचे एआयपीटीचे गेस्ट हाऊस आहे. या गेस्ट हाऊसमध्ये लष्कराला मिळालेल्या वेगवेगळ्या कार्याच्या पाच सिल्व्हर ट्रॉफी व दोन ब्रॉंझ सिल्व्हर ट्रॉफी येथील शोकेशमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, जवळपास एक महिन्यांच्या कालावधीत अज्ञाताने या गेस्ट हाऊसमध्ये घुसून या सर्व ट्रॉफी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. ट्रॉफींची किंमत जवळपास ८ लाख ३९ हजार रुपयांची असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर लष्करांकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक महाडिक हे करत आहेत.





















