Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

आयपीओमध्ये गुंतवणूकीचे आमिष, ४३ लाखांची फसवणूक

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी ५६ वर्षीय नागरिकाला तब्बल ४३ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ६ फेबु्रवारी ते २१ मार्च २०२६ कालावधीत खराडीत घडली आहे. त्यानुसार याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

अपघात प्रकरणात टँकर मालकासह चालकाला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खराडीत राहायला असून, ६ मार्चला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेअरमधील आयपीओत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यानंतर विश्वास संपादित झाल्यामुळे तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरूवात केली. अवघ्या सव्वा महिन्यांत सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून ४३ लाख रूपये वर्ग करून घेतले. मात्र, परतावा न मिळाल्यामुळे तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करीत आहेत.

पुण्यात गुरूवार पेठेतील तरूणाला ७ लाखांचा गंडा

व्हॉट्सअ‍ॅप कॉल करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला बिर्ला कंपनीचा एक्झीक्युटिव्ह बोलत असल्याची बतावणी केली. शेअर ट्रेडींगची माहिती देउन सायबर चोरट्यांनी तरूणाला ७ लाख ५२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ कालावधीत गुरूवार पेठेत घडली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तरूणाने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×