Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

बसप्रवासात उलटीचा केला बहाणा, चोरट्या महिलेला अटक

बसप्रवासात उलटीचा केला बहाणा, चोरट्या महिलेला अटक

वानवडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात उलटीचा बहाणा करीत महिला प्रवाशाला धक्का देउन त्यांच्या पर्समधून तब्बल ७ लाखांचे सोन्याचे दागिने चोरणार्‍या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३० मार्चला रात्री दीडच्या सुमारास वैदूवाडी परिसरात प्रवासादरम्यान घडली होती. ननीता दिनेश कांबळे (वय ३७, रा. विश्रांतवाडी, मूळ-गुलबर्गा, कर्नाटक ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

खडकीत घर फोडले; साडे चार लाखांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी 

तक्रारदार महिला आणि तिचा पती ३० मार्चला रात्री दीडच्या सुमारास हडपसर ते चिंचवडगाव असा पीएमपीएल प्रवास करीत होती. त्यावेळी वैदुवाडी बसस्टॉपजवळ बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेने उलटी येत असल्याचा बहाणा केला. महिलेला बाजूला सरकण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या पर्सची चैन उघडून सोन्याच्या दागिन्यांची छोटी पर्स चोरून नेली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पेट्रोलिंगवेळी पोलीस अमलदार विष्णू सुतार आणि अमोल गायकवाड यांना शिंदेवस्तीजवळ एक महिला थांबल्याची माहिती मिळाली. संबंधित महिला सोन्याचे दुकान कोठे असल्याचे विचारत होती.

वानवडी तपास पथकाने धाव घेत ननीता कांबळे हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून ६ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली असून, उलटीच्या बहाण्याने महिलेच्या पर्समधून दागिन्यांची चोरी केल्याचे सांगितले. ही कामगिरी उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी नम्रता देसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक संगिता जाधव, एपीआय उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद, अभिजित चव्हाण व आशिष कांबळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×