Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

पुण्यात नो ड्रग्स व्हॉलेंटिअर’ मोहिमेला वेग; युवकांना पुढे येण्याचे आवाहन

पुण्यात नो ड्रग्स व्हॉलेंटिअर’ मोहिमेला वेग; युवकांना पुढे येण्याचे आवाहन

पुणे पोलिसांची जनजागृती; शाळा-कॉलेजांत मोहीम राबविणार

marathinews24.com

पुणे – शहरातील वाढत्या अमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘नो ड्रग्स व्हॉलेंटिअर’ मोहिमेला वेग दिला असून युवकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. लष्कर पोलिस ठाणे हद्दीतील आझम कॅम्‍पस येथील असेंब्ली हॉल येथे झालेल्या जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. नशामुक्‍त तरूणाई पुणे पोलिस स्वयंसेवक मोहीमेच्‍या अनुंषगोन पुणे पोलिस, लष्कर पोलिस ठाणे, डॉ. पी. ए. इनामदार युनिव्‍हर्सिटी, अवामी महज, पद्मपाणी फाउंडेशन याच्‍या संयुक्‍त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

पासपोर्ट सेवा केंद्रामुळे वाहतूककोंडी – सविस्तर बातमी 

या कार्यक्रमास सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त निखिल पिंगळे, विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकर, उपायुक्त, राजलक्ष्मी शिवणकर उपस्थित होते.

लष्कर विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता अल्फान्सो, संतोष खेतमाळस, एम.सी.ई. सोसायटीच्या अध्यक्षा अबेदा इनामदार, ट्रस्टी आय.पी. इनामदार, पद्मपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल डंबाळे, तसेच डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठाचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. सुमारे २०० ते २५० विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अमली पदार्थांचे वाढते सेवन ही पुणे शहरातील गंभीर समस्या बनत असल्याचे नमूद करत पोलिसांनी यापूर्वी अनेक कारवाया केल्या असल्या तरी जनजागृती अत्यावश्यक असल्याचे अमितेश कुमार म्‍हणाले. यावेळी युवकांना व्यसनाचे दुष्परिणाम व त्यातून होणारे कौटुंबिक नुकसान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘नो ड्रग्स व्हॉलेंटिअर’ मोहिमेतून शहरातील एक लाख विद्यार्थ्यांना जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शाळा व महाविद्यालयांमध्येही मोहीम राबविण्यात येणार असून युवकांनी स्वयंसेवक म्हणून पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात ड्रग्स शोध पथकाचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×