Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण व्हावे; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक

marathinews24.com

पुणे – भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो,सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो,परराष्ट्र शक्तींचे निर्वाण होवो, देशबांधवांना सुस्थिती प्राप्त होवो, असा संकल्प भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक करतेवेळी केला. तर दहशतवादाविरोधी लढण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी,अशी गणरायाचरणी प्रार्थनाही त्यांनी केली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,राजेश पांडे,ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री – अजित पवाराकडून दहशतवादी हल्ल्यातील मृत्यू पावलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांना सांत्वन – सविस्तर बातमी

जे. पी. नड्डा म्हणाले, गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आलो.दहशतवाद्यांनी पेहलगाम मध्ये जे कृत्य केले, त्याला याला सडेतोड उत्तर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमची अपेक्षा आहे. या संकटातून देश ताकतीने पुढे जाईल आणि जे यामागे दोषी आहेत,त्यांना योग्य उत्तर देण्याकरिता गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो. तसेच बुद्धी आणि शक्तीच्या माध्यमातून भारत या संकटकाळातून बाहेर येईल. याकरिता पंतप्रधान मोदी यांना शक्ती प्रदान होवो, ही प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×