Breking News
पावसामध्ये चमकलेल्या विजेच्या प्रकाशावरुन खुनाची उकलपिंपरी महापालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमापिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक २०१७ ची संख्या कायम राहणारमहापालिका निवडणुका लक्षात घेवून मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा : राजेश पांडेलोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारीशालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्यादृष्टिने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे-पोलीस आयुक्त अमितेश कुमारपरिवहन मंत्रांची महामार्गावरील हॉटेल थांब्यांना अचानक भेटपर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागूस्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील- परिवहन मंत्री प्रताप सरनाईकशेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक

पुणे : दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई

नऱ्हेत सोसायटीतील ७ दुचाकी पेटविल्या

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका

marathinews24.com

पुणे – नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सराइताला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
मयूर रंगनाथ आरडे (वय २४, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. आरडे याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे, दरोडा घालणे, खुनाचा प्रयत्न करणे, तोडफोड करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

पुण्यात सराईतांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त – सविस्तर बातमी 

आरडे हा २०१९ पासून तो गंभीर गुन्हे करत आहे. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. कारवाई करुन त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. आरडे खूनशी असल्याने त्याच्याविरुद्ध नागरिक तक्रार देण्यास घाबरत होते. त्याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी तयार केला होता. या प्रस्तावाला पोलीस आयुक्तांनी नुकतीच मंजूर दिली. २४ एप्रिल रोजी त्याला तळजाई वसाहत भागातून ताब्यात घेण्यात आले. त्याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहुल गौड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण, सहायक निरीक्षक सागर पाटील, सहायक फौजदार बापू खुटवड, भाऊसाहेब आहेर, विनायक एडके, किरण कांबळे, गोरख ढगे, महेश मंडलिक, सागर सुतकर, बजरंग पवार, अमाेल पवार यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top