Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

संगीतविश्वातील अष्टपैलू आवाज हरपला-डॉ. नीलम गोऱ्हे

marathines24.com

मुंबई – शास्त्रीय संगीत असो किंवा उडत्या चालीची गाणी, प्रत्येक सुराला स्वतःच्या अनोख्या शैलीने जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी (दि. १२) दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एक सुवर्णयुग मावळले आहे, अशा शब्दांत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंद – सविस्तर बातमी

आशा भोसले यांनी आपल्या अष्टपैलू आवाजाने तब्बल सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गायकीत भावनांची समृद्धता, सुरांची अचूकता आणि विविधतेचा अप्रतिम आविष्कार दिसून येत होता. त्यामुळेच त्या प्रत्येक पिढीच्या हृदयात स्थान निर्माण करू शकल्या. त्यांनी सादर केलेल्या असंख्य गीतांनी भारतीय संगीतसृष्टीला नवी उंची दिली. पारंपरिकतेचा ठसा जपत आधुनिकतेशी साधलेला सुरेल मेळ हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या या अद्वितीय योगदानामुळे त्यांना देश-विदेशात विशेष मान्यता मिळाली.

आशा भोसले यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी भावना व्यक्त करत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×