Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

जुन्या वादातून दोन तरुणांवर हल्ला; पोटात चाकू भोसकला

रस्ता काँक्रिटीकरण करणार्‍या मजुरावर वार

काशेवाडीतील घटना, दोघांना अटक

marathinews24.com

पुणे – जुन्या वादातून काशेवाडीत चौघांनी दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करत एका तरुणाच्या पोटात धारधार हत्यार भोसकून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी पसार झालेल्या दोघांना अटक केली आहे. दोन अल्पवयीन मुलांचे शोध घेतला जात आहे. कमरअली सज्जरअली सय्यद (वय १८) आणि तुफेलअली अशरफअली सय्यद (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, दोन अल्पवयीन मुले पसार झाली आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; १० गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार – सविस्तर बातमी

पोलिसांच्या माहितीनुसार, कमरअली व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात जुने वाद आहेत. काशेवाडीतील त्रिकोणी गार्डन परिसरात तक्रारदार व त्याचा मित्र थांबलेले होते. तेव्हा रात्री साडे दहाच्या सुमारास चार आरोपी हातात लाकडी बांबू तसेच हत्यार घेऊन त्याठिकाणी आले. त्यांनी जुन्या वादातून तक्रारदार यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांच्यावर हत्याराने वार केले. गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा मित्र याच्या पोटात धारधार हत्यारे भोसकून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या गोंधळामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. नागरिक जमा होऊ लागताच आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी शोध घेऊन या दोघांना पकडले. त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार पसार झाले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×