Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

उपाहारगृहातील गल्ल्यातून २ लाख ३० हजारांची रोकड चोरीला

वडगाव बुद्रूकमध्ये घरफोडी, एक लाखांचा ऐवज चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – उपाहारगृहातील भटारखान्याचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील दोन लाख ३० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना बिबवेवाडी – कोंढवा रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपाहारगृहाचे मालक सुनील चंद्रशेखर शेट्टी (वय ४०, रा. बिबवेवाडी) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात मेफेड्रॉन तस्करीप्रकरणी ५ जणांना बेड्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टी यांचे बिबवेवाडी – कोंढवा रस्त्यावर उपाहारगृह आहे. चोरट्यांनी मध्यरात्री उपाहारगृहातील भटारखान्याचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील दोन लाख ३० हजार रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेट्टी यांनी पोलिसांकडे सोमवारी (२० एप्रिल) तक्रार दिली. पोलिसांनी उपाहारगृहाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस हवालदार तायडे तपास करत आहेत.

शहर परिसरात ओैषध विक्री, किराणा माल, तसेच मिठाई विक्री दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. बाणेर परिसरात एका प्रसिद्ध मिठाई विक्री दुकानातून ६० हजारांची रोकड चोरून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.

ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरी

खराडी परिसरात ओैषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील ३० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत विलास गणपत गोडसे (वय ३०, रा. खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री गोडसे यांनी दुकान बंद केले. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोकड चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक आवारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×