Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात सुरक्षा रक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

खासगी विद्यापीठात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल

चोरट्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पाषाण परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शमसुद्दीन उर्फ समीर चाँदसाहेब ककेरी (वय २६, सध्या रा. कीर्ती गार्डन, पाषाण, मूळ रा. कर्नाटक) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपाहारगृहातील गल्ल्यातून २ लाख ३० हजारांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ककेरी पाषाण परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ककेरी आणि त्याचा मित्र पाषाणमधील सुतारवाडी परिसरातून निघाले हाेते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी ककेरी आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. तू आमचे डेबिट कार्ड घेतले आहे, असे सांगून चोरट्यांनी त्यांना धमकाविण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी ककेरीची झडती घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याला धमकावून खिशातील ४० हजारांची रोकड काढून घेतले. ककेरीने आरडाओरडा केला. खिशातील रोकड लुटून चोरटे पसार झाले.

ककेरीने गावाला पैसे पाठविण्यासाठी रोकड काढून खिशात ठेवली होती. त्याच्याकडील रोकड लुटण्याची घटना घडल्यानंतर तो घाबरला होता. त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत. नऱ्हे परिसरात मद्य विक्री दुकानात काम करणाऱ्या तरुणाकडील दोन लाखांची रोकड लुटून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×