Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला

मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – हॉटेलच्या स्वयंपाक घराच्या मागच्या दरवाजाची लाकडी जाळी तोडून चोरट्यांनी २ लाख ३० हजारांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना २० एप्रिलला पहाटे चार ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील पुणे अड्डा हॉटेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४० वर्षीय नागरिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गॅस सिलेंडर वाहतुकीवरून वाद; चालकाला धमकावून ‘पत्रकाराने मागितली ५ हजारांची खंडणी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील पुणे अड्डा हॉटेल असून, २० एप्रिलला पहाटेच्या सुमारास तिघा चोरट्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. गल्ल्यातील २ लाख ३० हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी दुसर्‍या दिवशी हॉटेलमध्ये चोरी झाल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार तायडे करीत आहेत.

मेडीकल विक्री दुकानातून रोकड चोरीला

मेडीकल विक्री करणार्‍या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ३० हजारांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना १९ ते २० एप्रिल कालावधीत खराडीतील थिटे वस्तीवर असलेल्या शिवम मेडीकल अ‍ॅड जनरल स्टोअर्समध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक सावन आवारे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×