Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

भांडणाच्या रागातून तरूणाचा केला खून

भांडणाच्या रागातून तरूणाचा केला खून

आरोपीला अटक, दोघे अल्पवयीन ताब्यात

marathinews24.com

पुणे – भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणाला बॅटम पट्टीने मारहाण करीत त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून केल्याची घटना २० एप्रिलला पहाटे पावणेपाचच्या सुमारास बिबवेवाडी- कोंढवा रस्त्यासह,मार्केटयार्ड परिसरात घडली आहे. रोहन कांतीलाल ओव्हाळ (वय २८, रा. काकडेवस्ती, कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कौशल कमलेश लांडगे (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन ओव्हाळ आणि कौशल लांडगे हे एकमेकांचे नातलग असून, काही दिवसांपुर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. त्याच रागातून २० एप्रिलला पहाटेच्या सुमारास आरोपींनी रोहनला मार्वेâटयार्ड परिसरात बोलावून घेतले. त्याठिकाणी त्याच्यासोबत वादविवाद केल्यानंतर टोळक्याने त्याला मारहाण केली. त्याला बॅटम पट्टीने मारहाण करीत त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून केला. त्यानंतर टोळके पसार झाले होते. याप्रकरणी आरोपी कौशलला पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×