Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

डेक्कन नदीपात्रातील तरुणाचा खून प्रकरणाचा छडा

डेक्कन नदीपात्रातील तरुणाचा खून प्रकरणाचा छडा

आर्थिक वादातून तरुणाचा खून

marathinews24.com

पुणे – शहरातील डेक्कन जिमखाना परिसरात नदीपात्रात झालेल्या तरुणाचा खून प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला. आर्थिक वादातून तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला. गुन्हा करुन कर्नाटकात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी हडपसर परिसरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. ओंकार कांबळे (वय २७, रा. धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कुशल कसबे (वय ४२, रा. महात्मा फुले पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ५९ सेकंदांचा ‘तो’ व्हिडिओ ठरणार महत्त्वाचा पुरावा – सविस्तर बातमी  

डेक्कन जिमखाना भागातील नदीपात्रात रविवारी (१९ एप्रिल) कसबेचा मृतदेह सापडला होता. त्याचा गळ्यावर शस्त्राने वार करण्यात आले होते. याबाबत पोलीस शिपाई आकाश सोनवणे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सुरुवातीला मृतावस्थेत सापडलेल्या कसबे याची ओळख पटलेली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन त्याची ओळख पटवली. खूनामागचे कारण समजले नव्हते.
त्यानंतर पोलिसांनी कसबे याचे कुटुंबीय, निकटवर्तीयांची चौकशी केली. डेक्कन जिमखाना परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार कांबळेने त्याची दुचाकी हडपसर परिसरात लावल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दुचाकीचा शोध घेतला.

दुचाकीवर रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी डिक्की उघडली. तेव्हा डिक्कीत तीन मोबाइल सापडले. खून केल्यानंतर आरोपी कांबळेने शर्ट बदलला होता. तो आणि त्याच्याबरोबर असलेला अल्पवयीन साथीदार कर्नाटकातील गदग येथे पसार होण्याच्या तयारीत असून, दोघेजण हडपसर परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी कांबळेसह अल्पवयीन साथीदाराला सापळा लावून ताब्यात घेतले. कसबे याने आरोपी कांबळे याच्याकडून ७० हजार रुपये घेले होते. आर्थिक वादातून त्याने कसबेचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत खुनामागचे निश्चित कारण समजेल’, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×