Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

पुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

तीन अधिकार्‍यांचा समावेश, महाराष्ट्र दिनी होणार सन्मान

marathinews24.com

पुणे – पोलीस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय सेवा बजावणार्‍या पुण्यातील तीन अधिकार्‍यांसह १४ पोलिसांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (डी जी इनसिग्निया)जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंधेला पोलीस दलाने नावांची घोषणा केली आहे. संबंधित अधिकारी -कर्मचार्‍यांना महाराष्ट्र दिनी (दि. १) सन्मानचिन्ह देउन गौरवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सहपोलीस आयुत्क रंजनकुमार शर्मा यांनी सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – सविस्तर बातमी

पोलीस दलात कार्यरत असताना उल्लेखनीय कामासह धाडसी जबाबदारी बजावणार्‍या अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह हे पदक दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने कर्तव्यनिष्ठने काम केलेले अधिकारी-कर्मचारी, गुन्हे उघडकीस आणणे, नक्षलविरोधी मोहीम, कायदा-सुव्यवस्था राखणे यामध्ये विशेष कामगिरी बजावलेल्यांची निवड सन्मानचिन्हासाठी केली जाते. राज्यभरातील पोलीस अधिकारी, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हवालदार, कॉन्स्टेबल रँकचे कर्मचारी यासाठी पात्र असतात. दरम्यान, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह नावांची घोषणा झाल्यामुळे तीन अधिकार्‍यांसह पोलीस कर्मचार्‍यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पुण्यातील सन्मानचिन्ह जाहीर झालेले अधिकारी-कर्मचारी

पोलीस निरीक्षक वाहिद अकबर पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजया शिवाजी खुटवड, सहायक उपनिरीक्षक रूस्तम इसाक मुजावर, सहायक उपनिरीक्षक प्रवीण ज्ञानेदव शिंदे, हवालदार आश्रुबा चांगदेव मोराळे, हवालदार सलीम इन्नुस तांबोळी, हवालदार रामदास निवृत्ती गोणते, हवालदार नीलेश सोपान पर्वते, हवादलार दयाराम दादाराव शेगर, हवालदार शंकर बाबुराव कुंभार, हवालदार सुजित महादेव पवार, हवालदार अमोल परशुराम पिलाणे, हवादलार सौदुबा आप्पाराव भोजराव, महिला शिपाई प्रगती रामहरी ठोंबरे, एएनटीएफचे हवालदार मनोज महादेव पाटील यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×