मध्यवर्ती अभिनव चौकात घडला अपघात
marathinews24.com
पुणे – भरधाव ट्रॅव्हल्स चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकिृती स्थित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हा अपघात गुरूवारी ( दि.३०) सकाळी साडेसहाच्या सुमारास मध्यवर्ती अभिनव चौकात घडला आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्रॅव्हल्स चालक किरण रामभाऊ कचरे (वय ४२) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
पुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रॅव्हल्स चालक किरण कचरे हा गुरूवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्वारगेटहून अभिनव चौकातून पुढे जात होता. त्यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. ट्रॅव्हल्स वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या. अपघातात जखमी महिलांच्या डोक्याला व पायाला मार लागला आहे. अपघाताच्या आवाजामुळे आजूबाजूला राहणार्या नागरिकांसह सकाळच्या सत्रात व्यायामासाठी बाहेर आलेल्या नागरिकांनी धाव घेतली. त्यानंतर खडक पोलिसांसह नागरिकांनी जखमी महिलांना रूग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक किरण कचरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, अपघातात अत्रे सभागृहाजवळील लोखंडी रेलिंगचे मोठे नुकसान झाले आहे.






















