Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना

नागरिकांना १५ मे अखेर स्व-गणना करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे; या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईनपद्धतीने ‘स्व-गणना’ पूर्ण केली आहे.

‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य – सविस्तर बातमी

यावेळी जनगणनेच्या अनुषंगाने देशाच्या नियोजनासाठी लागणारी माहिती अचूक भरुया, जनकल्याणासाठी असलेली ही जनगणना पूर्ण करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिला टप्पा ‘स्व-गणना’ १ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून त्यानंतर
१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष घरगणना केली जाणार आहे. यामध्ये प्रगणक गृहभेटी देणार असून जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करणार असून यावेळी प्रगणकास सहकार्य करावे.

याकरीता केंद्र शासनाने जनगणना २०२७ करिता https://se.census.gov.in/ संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांनी या संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपल्या कुटुंबाशी निगडित अचूक माहिती भरावी, माहिती भरल्यानंतर एकदा पुन्हा खात्री करूनच ऑनलाईन दाखल करावी, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी केले.

यावेळी पुणे शहर तहसीलदार स्मिता माने, पुणे छावणी परिषदेचे सहायक जनगणना अधिकारी शकील मुजावर आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×