बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
marathinews24.com
बीड – (अनंत जाधव) – केज शहरातील रोजा मोहल्ला येथून चोरी गेलेल्या टेम्पो गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून, याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून चोरुन नेलेला टेम्पो हस्तगत करण्यात आला आहे. अवघ्या काही तासात गुन्हा उघड केला. पाप्या मुस्ताक फारुकी (रा. रोजा मोहल्ला केज) आणि आवेश ऊर्फ आवडया खाँजा शेख (रा. कोकीजपरी केज) नसीर कुरेशी (रा. रोजा मोहल्ला, केज) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
गॅस टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य ठार – सविस्तर बातमी
घराच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत टेम्पो लावला होता. तो अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. दि. ६ मे सकाळी टेम्पो घेवून जाण्यासाठी गेले असता त्यांना टेम्पो दिसून आला नाही. फिर्यादीवरुन पोलीस ठाणे केज गु.र.नं २६६/२०२६ कलम ३०३ (२) भा.न्यां. स प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास बीड स्थानिक गुन्हे शाखेने एका दिवसाच्या आत गुन्हा उघड करुन, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उमरे ऊर्फ पाप्या मुस्ताक फारुकी रा. रोजा मोहल्ला केज, आवेश ऊर्फ आवडया खाँजा शेख रा. कोकीजपरी केज यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. चोरी केलेला टेम्पो धारुर येथील एम. आय.डी.सी भागात उभा केल्याचे सांगितले. तो टेम्पो ही जप्त करुन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार दिलीप गित्ते, बप्पासाहेब घोडके, जफर पठाण, महेश जोगदंड, चालक पोलीस गणेश मराडे यांनी केली आहे.























