Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

गॅस टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य ठार

खेड शिवापूर टोलजवळ भीषण अपघात

marathinews24.com

पुणे – गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. ८) दुपारी खेड शिवापूर टोल नाक्याजवळ झाला आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी टँकरची तोडफोड केली असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातात ठार झालेले दाम्पत्य वारजे माळवाडी परिसरात राहायला होते.

सायबर चोरट्यांकडून तिघांची ३७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

राजेंद्र बबन मोरे (वय ५५) आणि सविता राजेंद्र मोरे (वय ४२, दोघे रा. वारजे माळवाडी) अशी ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. टँकर चालक राज किशन बी. (वय ३९ , रा. तिरुपुरम) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मोरे दाम्पत्य हे शुक्रवारी दुपारी सातार्‍याकडे चालले होते. खेड शिवापूर टोल नाक्याच्या पाठीमागील लेनवर भरधाव गॅस टँकर चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही टँकरखाली ओढले गेले. आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, मोरे दाम्पत्य चाकाखाली अडकल्यामुळे त्यांना बाहेर काढता आले नाही. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धडकेनंतर दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली होती.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. मात्र, गंभीर दुखापतींमुळे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, अपघाताच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी गॅस टँकरची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

चाकाखाली ५० फुट फरफटत नेले

भरधाव टँकर चालकाने पाठीमागून दुचाकीस्वार मोरे दाम्पत्याला धडक दिली. त्यामुळे दोघेही चाकाखाली सापडून सुमारे ५० ते ६० फुट फरफटत गेल्याचे दिसून आले आहे. दोघांच्या अंगावरून टँकर गेल्यामुळे रस्त्यावर दूरवर रक्तमांसाचा सडा पडल्याचे दिसून आले. त्यामुळे परिसरातून जाणार्‍या नागरिकांसह वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×