Breking News
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावाडिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट आणि परिणामकारक पर्यायभिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

धायरीत तरुणाच्या डोक्यात बॅट मारून खून

कात्रजमधील आंबेगाव भागातील घटना

marathinews24.com

पुणे – अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव भागात रविवारी रात्री घडली.
दीपक क्षीरसागर (वय ३८, रा. समर्थ हाईट्स, इंद्रायणीनगर, टेल्को काॅलनी, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धार्थ हातुरे आमि अनिकेत हातुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण करुन लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक क्षीरसागर हा पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कामाला होता. तो विवाहित होता. रविवारी रात्री जेवण केल्यानंतर तो इंद्रायणीनगर भागात घरासमोर थांबला होता. त्या वेळी दोघांनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी खून प्रकरणात चौकशी केली. तेव्हा दीपक याचा अनैतिक संबंधातून खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. मुंढवा परिसरात ब्युटी पार्लरचालक तरुणीचा खून करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. तरुणीचा मोटारीत गळा दाबून तिचा खून करण्यात आला. तिचा मृतदेह मुंढव्यातील केशवनगर भागात कचरा डेपोजवळ टाकून आरोपी पसार झाला. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करुन खून प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणी गोरखनाथ देवराव शिंदे (वय ४४, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. बीड) याला अटक करण्यात आली. अनैतिक संबंध, तसेच आर्थिक वादातून खून केल्याची माहिती तपासात मिळाली. अनैतिक संबंधातून शहरात खुनाच्या दोन घटना घडल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×