Breking News
गॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावाडिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट आणि परिणामकारक पर्यायभिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणारनिर्यातीच्या आमिषाने ४ कोटी ३२ लाखांची फसवणूकपुण्यात कौटुंबिक वादातून सुनेकडून सासूचा खूनप्रेमविवाह केल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वारस्वारगेट परिसरातील बेकायदा धंद्यांवर गुन्हे शाखेचा छापागुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून जेष्ठाची फसवणूकऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

डिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट आणि परिणामकारक पर्याय

दहावीनंतर डिप्लोमा : करिअरला वेग देणारा स्मार्ट मार्ग

marathinews24.com

पुणे – आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या युगात वेळेचे महत्त्व अधिक वाढले आहे. करिअर घडवताना योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, तर पुढील प्रवास अधिक सुलभ आणि यशस्वी होऊ शकतो. अनेक विद्यार्थी आणि पालकांसाठी दहावीनंतरचा टप्पा हा करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. पारंपरिक शिक्षण पद्धतीनुसार अकरावी-बारावी आणि त्यानंतर सीईटी सारख्या स्पर्धा परीक्षा हा एक परिचित मार्ग आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये वेळ, मेहनत आणि अनिश्चितता यांचा मोठा भाग असतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा अभियांत्रिकी पदविका (इंजिनिअरिंग डिप्लोमा) अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट आणि परिणामकारक पर्याय म्हणून पुढे येतो आहे.

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार-मंत्री अतुल सावे – सविस्तर बातमी

आज कौशल्याधारित व्यवसायिक शिक्षण रोजगार आणि स्वंयरोजगाराच्या दृष्टीकोनातून गरजेचे बनले आहे. अशा वेळी इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सैंद्धांतिक आणि प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञान देण्याबाबतीत समतोल साधत असल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध होऊ शकतात.

डिप्लोमा अभ्यासक्रम निवडल्यास विद्यार्थी थेट तांत्रिक शिक्षणाच्या प्रवाहात प्रवेश करु शकतात. ताण मुक्त वातावरणात शिकणारा विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे प्रगती करतो. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमात म्हणजेच बी.ई किंवा बी. टेक मध्ये थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. या प्रक्रियेला ‘लेटरल एंट्री’ असे म्हटले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक वेगवान बनतो. ते थेट पुढील स्तरावर जाऊन शिक्षण सुरू करू शकतात.

डिप्लोमा शिक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिक अनुभवही मिळतो. प्रयोगशाळा, कार्यशाळा आणि प्रकल्पांच्या (प्रोजेक्ट्स) माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची सवय लागते. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या पुढील टप्प्यात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना विषय समजणे अधिक सोपे जाते. त्यांच्या संकल्पना स्पष्ट असतात आणि त्यांना अभ्यासात आत्मविश्वास वाटतो. अनेकदा डिप्लोमा केलेले विद्यार्थी पारंपरिक मार्गाने आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक सक्षम दिसतात, कारण त्यांच्याकडे आधीच प्रॅक्टिकल अनुभव असतो. अनुभव हे ज्ञानाचे सर्वात मोठे शिक्षक आहे.

वेळेची बचत आणि तांत्रिक कौशल्यांची मजबूत पायाभरणी हे दोन्ही घटक करिअर घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आजच्या उद्योग क्षेत्राला केवळ सैद्धांतिक ज्ञानातच नव्हे, तर प्रत्यक्ष कामातही पारंगत असतील अशा विद्यार्थ्यांची गरज आहे. डिप्लोमा अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी अशा प्रकारे तयार होतात. दहावीनंतरच विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या तांत्रिक शाखेत प्रवेश घेतात. त्यामुळे त्यांची दिशा आणि दृष्टीकोन स्पष्ट राहतो, ते त्याच क्षेत्रात कौशल्य विकसित करु शकतात. या प्रक्रियेमुळे त्यांच्या करिअरचा पाया अधिक मजबूत बनतो. आजच्या काळात जितक्या लवकर विद्यार्थी योग्य दिशा निवडतात, तितक्या लवकर ते यशाच्या दिशेने वाटचाल करु शकतात.

करिअरची सुरुवात जितकी स्पष्ट आणि ठोस असेल, तितका पुढील प्रवास अधिक सोपा आणि यशस्वी होतो. डिप्लोमा हा केवळ एक पर्याय नसून तो एक स्मार्ट निर्णय आहे, जो विद्यार्थ्यांना वेळेची बचत करुन देतो आणि त्यांना करिअरच्या दिशेने वेगाने पुढे नेतो. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रम हजारो विद्यार्थ्यांसाठी यशाचा मार्ग ठरत आहे. तांत्रिक ज्ञान, प्रॅक्टिकल अनुभव आणि पुढील शिक्षणासाठी थेट संधी या सर्व गोष्टींचा संगम या अभ्यासक्रमामध्ये दिसून येतो.

योग्य निर्णय हा यशाची पहिली पायरी असतो. दहावीनंतर योग्य मार्ग निवडल्यास करिअरचा प्रवास अधिक वेगवान आणि परिणामकारक बनतो. डिप्लोमा नंतर थेट इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश ही संधी विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने करिअरला गती देणारी ठरते. अधिक माहितीसाठी भेट द्या: https://msbte.ac.in.

– संकलन: विभागीय माहिती कार्यालय, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×